लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगणा: एमआयडीसीमधील कटारिया एग्रो कंपनीला आग लागून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत, उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-24-at-1.51.11-PM.mp4

हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागली, सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. यात ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. नागपूर महापालिकेसह इतर पालिकांचे बंब आग विझविण्यासाठी गेले आहेत.

हेही वाचा… वादळी पावसाचा फायदा घेत नागपूरच्या अजनी वसाहतीतील शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड; महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार

दरम्यान घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three workers died in a fire at kataria agro company in hingana midc cwb 76 dvr
Show comments