लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : आईला आवाज देण्यासाठी गॅलरीत आलेला तीन वर्षाचा चिमुरडा गॅलरीचे दार लॉक झाल्याने गॅलरीतच अडकला. त्याचे ओरडणे ऐकूण खाली मोठा जमाव जमा झाला. अखेर ४५ मिनीट संघर्ष केल्यावर या चिमुरड्याची सुटका झाली.

ही घटना सोमवाारी संध्याकाळी शहरातील इतापे ले आउट परिसरातील विघ्नहर्ता अपार्टमेट येथे घडली. गॅलरीत अडकलेल्या मुलाचे नाव रियांश सुरडकर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नहर्ता अर्पाटमेंट मधे सुरडकर परिवार राहतो. आज दुपारी रियांशची आई काही कामानिमित्त बाहेर पडली होती.

आणखी वाचा-अकोला : सावधान! नायलॉन मांजामुळे महिलेचा पाय कापला; तब्बल ४५ टाके…

यावेळी घरात कुणीही नव्हते. घरात केवळ रियांश होता, यावेळी अचानक फ्लॅटचा दरवाजा आतून बंद झाला. तो त्याला उघडता येईना. त्यामुळे आईला आवाज देण्यासाठी रियांश घराच्या गॅलरीमध्ये गेला. चुकीने खिडकी सुद्धा लॉक झाली. यावेळी त्याने आईला अनेक वेळा आवाज दिला, परंतू त्याला उत्तर मिळाले नाही.

चिमुकल्या रियांशचा आरडा ओरड ऐकूण खाली बरीच गर्दी जमली. कुणाला काही कळेना म्हणून अनेकांनी अपार्टमेंटमध्ये जावून दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दार आतून बंद असल्याची माहिती मिळाली. यावर रियांश हा गॅलरीत अडकल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती परिसरतील काही लोकांनी अग्निशमन दलास व पोलिस विभागास दिली.

आणखी वाचा-ऐन हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी…असे काही घडले की ज्यामुळे….

यावेळी परिसरातील बिल्डिंग बांधकाम करणारे बिल्डर अश्विन सातपुते, प्रकाश उगले यांनी बांधकामासाठी वापरण्यात येणारा झुला उपलब्ध करून दिला. अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावरून झुला खाली सोडण्यात आला. मात्र, झुल्यावर कुणालाही चढता येत नव्हते, त्यामुळे सदर प्रयत्न अयशस्वी झाले. दरम्यान त्याचवेळी तिथून बांधकामावर मजुरी करण्यासाठी रवींद्र पंडित मगर हे जात होते. हा प्रकार त्याच्या लक्षात येताच त्याने झुल्यावर चढून दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतू यश मिळाले नाही.

अग्नीशमन दलाने केली सुटका

या घटनेची माहिती मिळाल्यावर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी भेट देत सदर अपार्टमेंट जवळ पोहचले. यावेळी शिडीचा वापर करुन रियांशची ४५ मिनीटानंतर सुखरुप सुटका केल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three year old boy trapped in gallery after window locked scm 61 mrj