नागपूर : सदरमधील माऊंट रोडवर असलेल्या मँकडाऊन हॉटेल अँड रेस्टॉरेंटमध्ये पतीसोबत नाच करणाऱ्या तरुणीशी तीन युवकांनी अश्लील कृत्य केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. २९ वर्षीय तरुणी पतीसोबत रविवारी रात्री दहा वाजता मँकडाऊन हॉटेल गेली होती.

जेवण झाल्यानंतर पतीसह नृत्य करीत असताना शेजारी नाचणारा युवक आकाश सुभाष कटारिया (२५, गवळीपुरा, सदर) आणि त्याचे दोन मित्र महिलेकडे अश्लील इशारे करीत होते. काही वेळपर्यंत तरुणीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आकाशने तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने पतीकडे तक्रार केली. मात्र, आरोपी तिघांनी तरुणीच्या पतीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

Story img Loader