गोंदिया: नेहमी आपल्या घराकडे, घरातल्या सदस्यांची काळजी घेणाऱ्या महिला या बहुधा कामाच्या अधिक व्याप्तीमुळे वा आरोग्याबद्दल असलेल्या निष्काळजीपणामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. हे आता जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४ लाख ४२ हजार २५७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात महिलांची तपासणी व रक्ताचे नमुने घेऊन आवश्यक त्या प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या. यात तपासणी अंती २२२९५ महिलांना रक्तक्षय, १७६२३ महिलांना उच्च रक्तदाब, ९४२८ महिलांना मधुमेह व ३१८० महिलांना थायरॉइड सारख्या समस्या असल्याचे समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे थायरॉइड हा आजार अनेकांना बळावताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतात. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाऱ्या अधिक असतात. त्यासोबतच नैसर्गिक मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – ‘ऑपरेशन मुस्‍कान’मुळे १० मुले सुरक्षित घरट्यात

गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या ३ महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या ४४.३ टक्के महिलांमध्ये आढळते. थायरॉईड ग्रंथी घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, शरिराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथीदेखील चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते. जर ही ग्रंथी खूप काम करत असेल किंवा खूप मंद गतीने काम करत असेल तर दोन्ही स्थितीत शरिराला त्रास होतो. जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते, तेव्हा एक लक्षण नाही तर शरिरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. थायरॉइडची एक नवीन समस्या शहरी व ग्रामीण भागात आढळून येत आल्याची माहिती समोर आली आहे. यात ३१८० महिलांपैकी १९७२ महिलांना हायपोथायरॉइड तर १२०८ महिलांना हायपरथायरॉइड दिसून आले आहे.

थायरॉईडची लक्षणे

जर वजन अचानक वाढत असेल तर तुम्हाला थायरॉईड असण्याची शक्यता आहे. पदार्थापासून तुम्हाला काहीच प्रोटीन किंवा एनर्जी मिळत नसेल तर त्याचा शरिरावर चांगला परिणाम होण्याची शक्यता कमीच असते. केसांना आवश्यक असलेले घटक तुमच्या शरिराला न मिळाल्यामुळे केस गळू लागतात. थायरॉईडचा त्रास असेल तर अशा महिलांना अनियमित पाळीचा त्रास होऊ लागतो. जर एखाद्या महिलेच्या मासिक पाळीचा कालावधी २८ दिवसांचा असेल तर तो ४०-४२ दिवसांचा होतो. कधी कधी दोन महिने सलग मासिक पाळी येतात. पुन्हा त्यामध्ये खंड पडतो. चेहरा आणि डोळ्यांना सूज येणे. बद्धकोष्ठता ही थायरॉइडची लक्षणे आहेत.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाला शंभर वर्षांचा इतिहास, १९५० ला आले होते पहिले राष्ट्रपती

थायरॉईड होण्याची कारणे

आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. जर आहारातील आयोडिनचे प्रमाण कमी झाले असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते. काही औषधे हार्मोन्सचे प्रमाण वाढवत असतात. जर तुम्ही कोणत्या इतर आजाराने ग्रस्त असाल आणि तुमची औषधं सुरू असतील तर त्यांचा परिणामदेखील तुमच्यावर होऊ शकतो. कधीही आणि काहीही खाण्याची हीच सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन तुम्हाला थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. अनेकदा थायरॉईडचा आजार होण्याचे कारण अनुवंशिकता असेही दिसून आले आहे. आहाराच्या बाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thyroid disease in 3180 women in gondia district neglect of women health sar 75 ssb
Show comments