नागपूर : नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या १६ वरून आठ केल्यानंतर प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने तिकीट दरात बदल करण्याच्या प्रस्तावावर रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा झाली. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते.वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने टीका होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा… राज-उद्धव आता तरी एकत्र या! , नागपुरात लागले फलक
प्रथम दिल्ली-डेहराडून या मार्गांचा आढावा घेतला जाईल. आणि त्यानंतर इतर मार्गांचा विचार केला जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात वंदे भारतचे तिकीट दर कमी होऊन प्रवाशांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत.ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या कमी आहे. त्या मार्गावरील गाड्यांच्या प्रवास भाड्याबाबत फेरविचार करण्याचे संकेत मिळत आहे. नागपूर-बिलासपूर आणि इतर काही मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या भाड्याचा आढावा घेतला जात आहे.