भंडारा : शंकरपट पाहून रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात असताना वाटेत दुचाकीवर वाघाने अचानक झेप घेतली. वाघाच्या हल्ल्यात दुचाकी चालकासह मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री ९ .३० वाजताच्या सुमारास घडली किटाळी जंगल मार्गावर घडली.
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे सुरू असलेला शंकर पट पाहण्यासाठी मनोज मेश्राम आणि माधव वलके,रा. गिरोला जापानी, ता. साकोली हे दोघेही आलेले होते. पट संपल्यानंतर दोघेही किटाळी मार्गे गावाकडे परत जाण्यास निघाले. रात्री ९.३० च्या दरम्यान किटाळी जंगल मार्गावर पोहचल्यावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. दोघेही दुचाकीवरून खाली पडले. आरडाओरड करताच वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला.मात्र वाघाच्या हल्यात दुचाकीचालक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.