चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या तरूणावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल वनपरिक्षेत्रातील रत्नापूर जंगलातील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये घडली. आशिष सुरेश सोनुले (३४) रा. रत्नापूर असे मृतक तरूणाचे नाव आहे. आशिष सोनुले हा शेतमजुरीचे काम करायचा. तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम सुरू झाल्याने तो गावातील चार नागरिकांसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता.

हेही वाचा >>> प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले, नोकरीही गेली…

Katol Assembly Constituency Salil Deshmukh accuses the ruling party in Anil Deshmukh attack case Nagpur news
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादातूनच देशमुखांवर हल्ला, पुत्र सलील यांचा गंभीर आरोप
Statement of Nagpur Police in the case of attack on Anil Deshmukh
प्रचार संपवून परत येताना कशी घडली घटना! अनिल…
Assembly Election 2024 Arvi Constituency Statement of Devendra Fadnavis regarding Dadarao Keche
“म्हटल्यानुसार १०० टक्के होईल,” देवेंद्र फडणवीस केचेंना म्हणाले…
parinay fuke on anil deshmukh
“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
attack on Anil Deshmukh, katol assembly constituency, salil deshmukh, maharashtra assembly election 2024,
अनिल देशमुखांवरील हल्ल्यामागील रहस्य… काय घडले नेमके?
Assembly election 2024 Nagpur famous Dolly Chaiwala road show for candidate Abhilasha Gavture in Ballarpur Chandrapur news
दिग्गज नेत्यांनी चंद्रपूरचे प्रचार मैदान गाजवले; ‘डॉली चायवाला’चा रोड शो
Assembly Election 2024 Nagpur district one lakh new young voters
एक लाख नवे तरुण मतदार, नागपूरच्या विधानसभा निकालांवर मोठा परिणाम?
attack on BJP candidate Pratap Adsads sister archana rothe
भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्‍या बहिणीवर हल्‍ला, राजकीय वर्तुळात खळबळ
Nagpur Rural SP Harsh Poddar
Anil Deshmukh Injured: अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “घटनेमागील तथ्य…”

रत्नापूर जंगलातील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये तेंदूपत्ता तोडत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष वर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात आशिषचा जागीच मृत्यू झाला. ही बाब इतरांना कळताच आरडा-ओरड केली असता, वाघाने जंगलात पळ काढला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कोरेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे रत्नापूर व पडझरी परीसरात दहशत निर्माण झाली आहे.