चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या तरूणावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल वनपरिक्षेत्रातील रत्नापूर जंगलातील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये घडली. आशिष सुरेश सोनुले (३४) रा. रत्नापूर असे मृतक तरूणाचे नाव आहे. आशिष सोनुले हा शेतमजुरीचे काम करायचा. तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम सुरू झाल्याने तो गावातील चार नागरिकांसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले, नोकरीही गेली…

रत्नापूर जंगलातील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये तेंदूपत्ता तोडत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष वर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात आशिषचा जागीच मृत्यू झाला. ही बाब इतरांना कळताच आरडा-ओरड केली असता, वाघाने जंगलात पळ काढला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कोरेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे रत्नापूर व पडझरी परीसरात दहशत निर्माण झाली आहे.