चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणामधील वनखंड क्रमांक ५७१ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली. मृत मादी बछडा अंदाजे एक वर्षाचा असून त्याचा मृत्यू मोठ्या वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.

हेही वाचा >>> भरधाव टिप्परच्या धडकेत महिला ठार, एक जखमी….

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

कळमणा वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वनखंड क्रमांक ५७१ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार व डॉ. आनंद नेवारे यांनी शवविच्छेदन केले. पाकिटबंद नमुने पुढील रासायनिक विश्लेषणाकरिता वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.