नागपूर : रामटेक वनपरिक्षेत्राअंतर्गत मनसर वनक्षेत्रातील बोंद्री येथील शेतात शनिवारी सायंकाळी वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृत्यू वीजप्रवाहाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
वनखात्यातील कर्मचारी दैनंदिन गस्त करत असताना बोंद्री येथील शेत सर्वे क्रमांक १३९ मध्ये त्यांना एक वाघ मृतावस्थेत आढळला. सुमारे पाच ते सहा वर्षांचा हा वाघ असून आकाराने अतिशय मोठा आहे. घटनेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी नागपूर प्रादेशिकचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांना दिली. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक हरविर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते तसेच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू घटनास्थळी पोहोचली.
हेही वाचा – चंद्रपूर : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांची स्वबळाची भाषा…
हेही वाचा – ‘मेगाब्लॉक’मुळे १४ रेल्वेगाड्या रद्द; जाणून घ्या सद्यस्तिथी
रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन शक्य नसल्याने मृत वाघाला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणले. रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. शेताला सौर कुंपण असले तरी या वाघाचा मृत्यू विज प्रवाहाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे उपस्थित होते. वाघाच्या मृत्यूप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.