चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चालबर्डी येथील पहीत शेतशिवारात शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाचा कडघरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. हा वाघ पाच वर्षे वयाचा आहे. चालबर्डी येथील शेत सर्व्हे क्रमांक ५४ मध्ये शिकारीच्या शोधात असताना विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड

ही माहिती वनरक्षक जे.ई. देवगडे यांना माहिती झाली. त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना दिली. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक जी.आर. नायगमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नर जातीचा वाघ हा कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे शव चंद्रपूर येथे नेण्यात आले. तिथे डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. आर.एस. रोडे या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा पुढील तपास वन अधिकारी करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger dies after fall into a well in chandrapur rsj 74 zws