नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील उमरेड(वन्यजीव) वनपरिक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचारी गस्तीदरम्यान वनरक्षक जफरअली सय्यद यांना कक्ष क्र. १४१८ मध्ये नाल्याजवळ सावकार नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. आज, शनिवारी ही घटना उघडकीस येताच पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई घटनास्थळी पोहोचले.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या प्रमाणीत कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन केले असताना वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. वाघाचा अंगावर सुळे घुसलेल्या गुणा आणि तुटलेल्या अवस्थेत खुब्याचे हाड दिसून आले. यावरुन दोन वाघाच्या झुंझीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.