नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ एरवीही पर्यटकांना मनसोक्त दर्शन देतात. कधी मस्ती करताना, तर कधी पाणी पिताना, कधी भांडताना अशा नानाविध पर्यटकांचे मनोरंजन करतात. मात्र, ताडोबातील या वाघाला कदाचित या पर्यटकांचा कंटाळा आला असावा आणि म्हणूनच पर्यटनादरम्यान त्याने पर्यटकांना पाहून लांबलचक जांभई दिली. त्याच्या या कृतीतून तो जणू हेच सूचवत होता, की ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय.’ त्याची ही कृती वन्यजीव संवर्धक व छायाचित्रकार दीप काठीकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या जास्त आणि साम्राज्य देखील वाघांचेच. त्यामुळे त्यांच्या मनात आले तरच ते पर्यटकांच्या समोर येतील, नाही तर आपल्या कृतीतून ते पर्यटकांना परत जाण्याचा इशारा देखील देतील. या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढली तरीही त्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. मात्र, वाघांचेच वर्चस्व ताडोबात अधोरेखित झालेले दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा