नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावत नाहीत. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी एक वाघ स्थिरावला आहे. आता याच व्याघ्रप्रकल्पात तब्बल १०० किलोमीटरचे अंतर पार करून नवीन वाघाचे नैसर्गिक स्थलांतर झाले आहे. या वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्रप्रकल्पातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले.

२०१८ सालानंतर गेल्यावर्षी १७ डिसेंबरला प्रथमच सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचे नामकरण ‘एसटीआर-१’ असे करण्यात आले. गेल्या वर्षभरात अगदी मुसळधार पावसातदेखील सह्याद्रीतील कर्मचाऱ्यांनी या वाघाच्या हालचालींवर देखरेख ठेवली. आता वर्षभरानंतरही हा वाघ व्याघ्रप्रकल्पामध्येच स्थिरावल्याचे लक्षात आले आहे. अशा परिस्थितीत २४ आक्टोबर २०२४ ला चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपने रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी एका नर वाघाचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र व्याघ्रप्रकल्पाच्या ‘टायगर सेल’ या संशोधन विभागाने तपासले. तपासणीअंती हे छायाचित्र ‘एसटीआर-१’ या वाघाचे नसून दुसऱ्या वाघाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातील वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्याकडे हे छायाचित्र तपासण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी हे छायाचित्र राधानगरीमध्ये २०२२ साली छायाचित्रित झालेल्या नर वाघाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-२’, असे करण्यात आले आहे.

white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

हे ही वाचा… Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात २३ एप्रिल २०२२ला ‘एसटीआर-२’ या वाघाचा वावर निदर्शनास आला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा वाघ राधानगरीमध्येच वास्तव्यास होता. राधानगरीत या वाघाचे शेवटचे छायाचित्र यंदाच्या उन्हाळ्यात १३ एप्रिल २०२४ला टिपण्यात आलेत. त्यानंतर पावसाळ्यात साधारण १०० किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला आहे. हा वाघ अंदाजे सहा ते सात वर्षांच्या असून मादीच्या शोधात तो चांदोलीत आल्याची शक्यता आहे. मात्र, सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सध्या मादी वाघाचे अस्तित्व नाही. ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : ईडीच्या दबावामुळे भुजबळांना भाजपात जावं लागलं? बावनकुळे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…

गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या दक्षिणेस असलेल्या तिलारी ते राधानगरी भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गामधून ‘एसटीआर-१’ आणि ‘एसटीआर-२’ हे दोन्ही नर वाघ नैसर्गिकरित्याच सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे अधोरेखित झाले आहे. – रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक