चंद्रपूर : वाघ हा शिकार करण्यात निष्णात आहे. शेतात चरणाऱ्या गाईवर मागून हळूच येत तिची वाघाने शिकार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शिकार करताना वाघाची चतुराई दिसत आहे. वाघाच्या शिकारीचा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आहे.

वाघाने शिकार केल्याचे असंख्य व्हिडीओ समाजमाध्यमांवर सार्वत्रिक फिरत असतात. असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाला आहे. यामध्ये जंगल शेजारी असलेल्या शेतात गाय चाराई करत आहे. अशातच मागून वाघ चोर पावलांनी येतो आणि गायीवर हल्ला करतो. या हल्ल्यात वाघ गायीची अतिशय निष्णातपने शिकार करतो.

हेही वाचा – नागपूर : प्रभू रामाच्या रामटेकमध्ये शिवरायांची ‘शिवसृष्टी’

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – फडणवीस यांच्या अभियानात नागपूर राज्यात अव्वल

वाघाच्या शिकारीचा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आहे. जांभोल नर वाघाने ही शिकार केली आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक संजय करकरे यांनी दिली.

Story img Loader