गडचिरोली : विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची धक्कादायक घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबररोजी उघडकीस आली. घटनास्थळी आढळलेल्या मृत वाघाचे शिर व तीन पंजे गायब होते. रानटी डुकराच्या शिकारीसाठी हा सापळा रचण्यात आला होता पण त्यात वाघ अडकल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. परिसरातील नागरिकांना अधूनमधून या वाघाचे दर्शन होत होते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळच्या सुमारास जंगलात गेलेल्या गुराख्याला वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याने गावात याबद्दल माहिती दिली असता तात्काळ वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पण पंचनामा केला. यावेळी मृत वाघाचे तीन पंजे व शिर गायब होते.  दरम्यान, गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे व वन विभागाने अधिकारी उपस्थित होते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Hyena herd tried to attack the lion
‘संकटात सगळ्यांचे नशीब साथ देत नाही…’ तरसाच्या कळपाने केला सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न… पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

प्रथमदर्शनी वाघाला करंट लावून मारल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, यासह विविध बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होतील.- मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक गडचिरोली