चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाने हल्ला करून एकाला ठार केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहर्ली गावाजवळ घडली. निलकंठ ननावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – नागपूर: लहानशी चूक जीवावर बेतली; महिलेचा मुलींसमोरच रेल्वेखाली आल्याने मृत्यू
निलकंठ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गावाजवळ असलेल्या तलावाजवळून जंगलात जात होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक निलकंठ यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांना जंगलात फरफटत नेले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, अधिक तपास वनविभाग करीत आहे.
First published on: 08-02-2023 at 14:08 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger killed farmer going to the field in moharli rsj 74 ssb