चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राने दर्जेदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये भाजपाचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. त्यावेळी वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रे हाती घेतली आणि सर्वांत आधी वन्यजीव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. व्याघ्र संवर्धनातून व्याघ्र व्यवस्थापनाचा मार्ग त्यांनी शोधला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वाघांची शिकार रोखून त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्या सुरक्षेची हमी देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ भारतातीलच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकांनाही महाराष्ट्रातील जंगल आकर्षित करतील यासाठी प्रयत्न केले. व्याघ्रसंवर्धनाच्या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम त्यांनी राबवले. आज २०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास गेली आहे. त्याचे श्रेय महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन व व्याघ्र व्यवस्थापनाला जाते.

हेही वाचा – “शेतकरी संकटात अन् राज्यकर्ते यात्रेवर!”, खासदार अरविंद सावंत यांची टीका; म्हणाले, “आता तर लोकशाही बचाव..”

अभिनयातला ‘वाघ’ आला होता धावून

व्याघ्रसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी अभिनयातला ‘वाघ’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत होण्याची गळ घातली. अमिताभ यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला. सर्वसामान्यांना व्याघ्रसंवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – “पारस मंदिर दुर्घटनेला अघोरी पूजा, अंधश्रद्धा जबाबदार!”, कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सरकार चौकशी करणार

ताडोबात २०० हून अधिक वाघ

महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचली आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेरड-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे आणि हे सारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दुरदृष्टीमुळे शक्य झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger population doubles in maharashtra quality performance of forest department under the leadership of forest minister mungantiwar rsj 74 ssb