गावाच्या वेशीवर आणि शेतात येणारा वाघ आता थेट गावात येऊ लागल्याने ग्रामस्थांचे घराबाहेर पडणे कठीण झाल्याचे चित्र देसाईगंज तालुक्यात पाहायला मिळत आहे. फरी गावातील नागरिकांनी गावात आलेल्या वाघाला पळवून लावले. मात्र, दहशतीमुळे नागरिक आता घराबाहेर एकटे पडण्यास तयार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चंद्रपूर: ‘त्या’ वाघाच्या मिशा व चार दात जप्त

ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतर होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेषत: देसाईगंज आणि गडचिरोली वन विभागात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे वाघ आणि मनुष्य असा संघर्ष पहायला मिळतो आहे.गेल्या दोन वर्षात वाघांनी या भागातील जवळपास तीस नागरिकांचा बळी घेतला. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात प्रचंड भीती आहे. परिणामी येथील तीस टक्के शेती ओसाड पडली असून वनउपजदेखील गोळा करायला बाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. वन विभाग अशाप्रसंगी धावून येत आहे, मात्र अप्रशिक्षित मनुष्यबळामुळे त्यांचे प्रयत्नदेखील अपुरे पडत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigers now started coming directly to the village amy
Show comments