चंद्रपूर: ब्रह्मपुरी अंतर्गत दक्षिण ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रातील आवळगाव उपप्रदेशातील हळदा बिट, खोली क्र. ११६८ मध्ये रविवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाने दोन ते अडीच वर्षे वयोगटातील वाघिणीला जेरबंद केले.

गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. २९ऑक्टोबर रोजी पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे एका मेंढपाळाचा वाघाने बळी घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खडसांगी वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा १ नोव्हेंबरला हळदाच्या मारहाणीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनविभागाच्या आवळगाव उपविभागातील हळदा गावातील सयत्राबाई नामदेव कामडी (७०) या महिलेला बुधवारी सकाळी ११६८ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये शेतात भात कापणी करत असताना वाघाने त्यांना ठार केले. तेव्हापासून ब्रह्मपुरी वनविभागाचे वन कर्मचारी या वाघिणीला पकडण्यासाठी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा – ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने पुकारलाला एसटीचा संप फसला काय? महामंडळ म्हणते..

दुपारी चार वाजता या वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच डॉ.आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी. व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, आणि आर.आर.टी मराठा, पोलीस नाईक, (शूटर) ताडोबा अंधारी. व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश आहुजा, जीवशास्त्रज्ञ, वनविभाग ब्रम्हपुरी, या पथकाने तिला शांत करून पकडले. त्यानंतर वाघिणीला चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमध्ये हस्तांतरित करण्यात आले.

हेही वाचा – उपराजधानीत प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांचा धुमाकूळ

शेंडे वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) दक्षिण ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरआरटी ​​सदस्य दिपेश. डी. टेंभुर्णे योगेश. डी. लाकडे, गुरु नानक व्ही. ढोरे, वसीम एन. शेख, विकास. एस. ताजने, प्रफुल. एन. वाटगुरे, ए. डी. कोरपे आर.आर. टी. चालक, ए. एम. दांडेकर, आर.आर.टी. चालक आदी सहभागी होते.