चंद्रपूर : भद्रावती वनपरिक्षेत्रातील चिपराळा नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक २११ मध्ये कुजलेल्या अवस्थेत वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली. मृत वाघीण सहा ते सात वर्ष वयाची असून तिचे सर्व अवयव शाबूत आहेत. वनविभागाचे कर्मचारी कक्ष क्रमांक २११ मध्ये गस्तीवर असताना त्यांना कुजलेल्या अवस्थेत वाघिणीचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा >>> नागपूर: रेल्वेतील महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकली अन्
माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहाेचून पाहणी केली. मृत वाघिणीचे चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंन्ट सेंटर येथे विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसरंक्षक आदेशकुमार शेडगे, व्हि. व्हि. शिंदे, वनरक्षक जे. ई. देवगडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व डॉ. कुंदन पोहचलवार, बंडुजी धोतरे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले. मृत वाघिणीचे दात, नखे व मीशा शाबुत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.