चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील आष्टी काकडे गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना ३१ जुलै रोज सोमवारला सकाळी उघडकीस आली. सदर वाघीण अंदाजे चार ते पाच वर्षाची आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. याबाबत अधिकृत माहिती शवाविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सकाळी काही गावकऱ्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेली दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

हेही वाचा… आमदार यशोमती ठाकूर यांना ठार मारण्‍याची धमकी देणाऱ्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल

या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे. हा आठवडा जिल्ह्यातील वाघांसाठी घात वार ठरला असून जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू या आठवड्यात झालेला आहे.