यवतमाळ : रखरखत्या उन्हामुळे टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा जीवही कासावीस झाला आहे. तहान भागविण्यासाठी वाघ पाणवठ्यावर येत असल्यामुळे पर्यटकांचीही या ठिकाणी गर्दी वाढली आहे. दरम्यान, पाणवठ्यावर आलेली एक वाघीण जखमी असल्याचे पर्यटकांनी टिपलेल्या छायाचित्रात दिसून आले. वनविभागाचे अधिकारी तिच्यावर लक्ष ठेवून आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video : नागझिऱ्यातील ‘ती’ वाघीण पर्यटकांसमोर आली अन्…; स्थलांतरित वाघिणी स्थिरावत असल्याची नांदी

दोन दिवसांपूर्वी रानडुकराची शिकार करताना वाघीण जखमी झाल्याची माहिती मिळाली. तिच्या मागील पायाच्या मांडीवर जखम आहे.  ही जखम जवळपास दीड इंच लांब आहे. रानडुकराची शिकार करताना त्याचे दात लागल्यामुळे जखम झाल्याची शक्यता आहे. अनेक पर्यटकांनी या जखमी वाघिणीला कॅमेरात टिपले. सफारीमधील जिप्सीवर कार्यरत गाईडने दिलेल्या माहितीप्रमाणे, टिपेश्वर अभयारण्याचे वनअधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी या वाघिणीवर लक्ष ठेवून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress injured while hunting wild boar at tipeshwar sanctuary nrp 78 zws