लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पूर्णतः प्लास्टिक बंदी असताना बफर झोनमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा तत्सम वस्तूंशी खेळणाऱ्या वाघिणीच्या घटना नित्याच्या होत आहेत.

मंगळवारी सायंकाळच्या सफारीत १५ महिन्याची एक मादी गमबूट सोबत खेळताना पर्यटकांनी छायाचित्र टिपले आहे. मंगळवारी संध्याकाळी सफारीदरम्यान, पर्यटकांना निमढेला पर्यटन झोनमध्ये भानुसखिंडी वाघिणीचे सुमारे १५ महिन्यांचे तीन शावक गमबूटने खेळताना दिसले.

आणखी वाचा-नागपूर: ऑनलाइन गेम्सवर बंदीसाठी जनहित याचिका

“आम्ही एका नर वाघाचे शावक रस्त्याच्या कडेला विसावताना पाहत होतो, तेव्हा अचानक एक मादी बहीण तोंडात गमबूट घेऊन जंगलाच्या आतून दिसली. ती बुटाने खेळली आणि रस्त्यावर फिरू लागली जेव्हा नर शावक बूट हिसकावून घेत होता. तर तिसरे शावकही नंतर त्यांच्यात या खेळात सहभागी झाले. “तीन खेळकर वाघाची पिल्ले पर्यटकांना भुरळ घालत असली तरी, व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक आणि रबर सामग्री आढळून येणे ही चिंतेची बाब आहे आणि उद्यान व्यवस्थापनाने यासाठी जागृत असणे हे देखील एक आवाहन आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात कोर व बफर झोनमध्ये पूर्णतः प्लास्टिक बंदी आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टीक बॉटल पासून प्लास्टिकचे कोणतेही साहित्य प्रकल्पात सफारी दरम्यान घेऊन जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. अशातच वाघिणीचे शवक गम बूट सोबत खेळत असतानाचे छायाचित्र समोर आल्याने ताडोबा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress plays with a gum boot in the plastic banned tadoba tiger reserve rsj 74 mrj