नागपूर : मूल लहान असतं तेव्हा त्याला सगळं शिकवण्याची जबाबदारी त्याचे कुटुंब घेत असले, तरी त्याला खाउपिऊ घालण्याची जबाबदारी मात्र त्याची आईच घेत असते. अगदीच त्याला पहिला घास भरवण्यापासून. प्राण्यांच्या बाबतीत मात्र सगळीच जबाबदारी त्या प्राण्यांची आई घेत असते. वाघांच्या बाबतीत तर ते अधिकच लागू पडते. पेंच व्याघ्रप्रकल्पातील खवासा बफर क्षेत्रात “जुगनी” नावाच्या वाघिणीने तिच्या बछड्याला शिकार करण्यापासून तर ती खान्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. हा प्रसंग वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी टिपला.

वाघ आणि वाघिणीच्या मिलनानंतर वाघ त्या वाघिणीपासून दूर जातो. एवढेच नाही तर वाघिणीने बछड्याना जन्म दिल्यानंतर सुद्धा वाघ त्याकडे ढुंकूनही बघत नाही. अपवादात्मक प्रकरणामध्येच वाघ वाघिणीसोबत असतो किंवा तो बछड्याना सांभाळतो. मात्र, ९९ टक्के प्रकरणामध्ये वाघीण त्या बछड्याची सर्व जबाबदारी उचलते. त्या बछड्याच्या संरक्षणापासून तर त्याला शिकार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यापर्यंत आणि ती शिकार खान्यापर्यंत.

Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…
Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
tiger cut into three pieces bhandara
भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

हेही वाचा…दारू सोडविण्याच्या नावावर अमानुष मारहाण; कथित बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

साधारणपणे बछडे दोन वर्षांपर्यंतचे होईस्तोवर आईसोबत म्हणजेच वाघिणीसोबत असतात. त्यानंतर ते स्वतःचा अधिवास शोधून तिकडे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात. त्यामुळे वाघीणच त्या बछड्याना या कालावधीत शिकार करायला शिकवते. साधारणपणे वाघ तीन दिवसपर्यंत आपली शिकार खातात आणि एकदा शिकार केल्यानंतर ती शिकार ते लपवून ठेवतात. त्यातही रानगव्यासारखी मोठी शिकार असेल तर ती त्यांना बरेच दिवस पुरते. पेंच व्याघ्रप्रकल्पातील खवासा बफर क्षेत्रात “जुगनी” या वाघिणीने रानगव्याची शिकार केली. ती शिकार केल्यानंतर तिचा बछडा त्या शिकारीवर ताव मारायला आला. त्याला ती शिकार नीट खाता येत नव्हती, त्यामुळे “जुगनी” ही वाघीण देखील त्याठिकाणी आली आणि तिने त्याला रानगव्याची शिकार खाण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनतर त्या बछड्याने त्या शिकारीवर ताव मारला.

हेही वाचा…आनंदवन हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हे दृश्य नेहमीच पर्यटकांना दिसते, पण इतर व्याघ्रप्रकल्पात क्वचितच पर्यटकांना हा प्रसंग अनुभवायला मिळतो. रानगव्याची शिकार करणे इतके सोपे नाही. वाघापेक्षा कितीतरी पटीने तो मोठा आणि धिप्पाड प्राणी आहे. तरीही वाघाला शिकारीचे तंत्र अवगत असल्याने तो ही किमया सहज करतो. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील आणि मग उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात स्थलांतरित झालेल्या “जय” या वाघाने अवघा दीड वर्षाचा असतानाच नागझिरा जंगलात रानगव्याची शिकार केली होती.

Story img Loader