गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन वर्षात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मानवी वस्तीजवळ किंवा रस्त्यालगत वाघांचा मुक्तसंचार देखील वाढला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव- कासवी मार्गावर रस्ता ओलांडताना वाघिणीला चार बछड्यांसह कॅमेऱ्यात टिपण्यात आले. ही चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/tiger.mp4
वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात आली

ताडोबाची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्यामुळे मागील काही वर्षात वाघांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली. यामुळे वाघाचे हल्ले देखील वाढले. गडचिरोली आणि देसाईगंज वनविभागात वाघांचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे या क्षेत्रात रस्त्यालगत वाघांचा वावर असतो. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उसेगाव-कासवी मार्गावर एक वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात आली. या मार्गावरील रहदारी काही काळ थांबली होती. यावेळी अनेकांनी वाघिणीचा मुक्तसंचार कॅमेराबध्द केला.