बुलढाणा : रेतीचे अवैध उत्खनन, वाहतुकीचा केंद्रबिंदू ठरलेल्या खडकपूर्णा धरण परिसरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफियांचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. रेती माफियाचे मनोधैर्य कमालीचे वाढले आहे. काल मंगळवारी याचा भीषण प्रत्यय आला. रात्री दहा वाजताच्या सुमारास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका तलाठ्याला सुसाट वेगाने अक्षरशः उडविले. या जोरदार धडकेमुळे तलाठी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्याला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे ही घटना घडली. परमेश्वर दामोधर बुरकुल असे गंभीर जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नसून प्राथमिक माहितीनुसार, तलाठी परमेश्वर बुरकुल हे दुचाकीने देऊळगावराजाकडे जात होते. दरम्यान, मही गावाजवळ त्यांना अज्ञात टिप्पर चालकाने संभाव्य कारवाईच्या भीतीने सुसाट वेगात जोरदार धडक दिली. त्यामध्ये बुरकूल हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रारंभी तातडीने नाजिकच्या देऊळगाव मही येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांच्या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.

Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Sindkhed Raja, Sindkhed Raja Constituency,
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आग्रही! धनुष्य की घड्याळ? सिंदखेड राजात युतीचा मजेदार तिढा कायम!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”

हेही वाचा – रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

दरम्यान घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन देऊळगाव राजा पोलिसांनी सुसाट वेगाने पसार झालेल्या टिप्परचा शोध सुरू केला होता. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना याची माहिती देऊन नाकाबंदी करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांस गंभीर जखमी करणाऱ्या वाहनाचा शोध लागू शकला नाही. प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा – नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस

या घटनेमुळे वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा यंत्रणेने युद्ध पातळीवर काम कण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस विभाग, महसूल खाते, प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त बैठक घेतली होती. त्यात संयुक्त कारवाई करण्याचे सुतोवाच करण्यात आले. मात्र या घटनेने रेती माफियाची मुजोरी, मनोधैर्य किती वाढले हे दिसून येते.

Story img Loader