लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ड्रायफ्रूट्स व्यापाऱ्याच्या मुलाला एमडी नावाच्या ड्रग्सचे एका तस्कराने व्यसन लावले. त्याला उधारीत ड्रग्स विकून कर्जबाजारी केले. त्याला पैशासाठी धमकी दिल्यामुळे भीतीपोटी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी ड्रग्स विक्रेत्यावर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सोहेल इद्रीस मिर्झा (वय २७, रा. मानकापूर) असे आरोपी ड्रग्स विक्रेत्याचे नाव आहे.

सोहेलचे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे तो गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात ड्रग्स विक्री करतो. काही महाविद्यालयात आणि पब, हुक्का पार्लरमध्ये त्याने ग्राहक निर्माण केले. त्यातच त्याने अनुज अजय गुप्ता (वय २४, रा. श्री तुलसी निवास, नेहरु पुतळाजवळ, लकडगंज) याला एमडी ड्रग्सचे व्यसन लावले. त्यानंतर त्याला विक्री करणे सुरु केले. उधारीत ड्रग्स विक्री करून जवळपास १ लाख रुपये अनुजकडे उधारी झाली. सोहेल मिर्झा याने अनुजला घरी येऊन ड्रग्सची उधारी वसुली करण्याची धमकी दिली. त्यामुळे अनुजने रविवारी २५ जूनला रात्री एक वाजता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आणखी वाचा- चोवीस तासांत दोन हत्याकांडाने उपराजधानी हादरली

सोहेलनेच अनुजला दारू, सिगारेट व एमडीचे व्यसन लावले होते. त्याला कुटुंबातील सर्वांनी समजविले होते. तो नेहमी तणावात राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने सुसाईड नोटमध्ये आरोपी सोहेल इद्रीस मिर्झा याने आपणास एमडीचे व्यसन लावले. त्यानंतर तो आपणास एमडी उधारीत देत होता, असे लिहून ठेवले. त्या चिठ्ठीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी सोहेलची चौकशी केली. त्यात सोहेलचे ड्रग्सविक्रेत्याशी संबंध असल्याचे आढळले. त्यामुळे अनुजला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of drug dealers troubles young man commits suicide adk 83 mrj