चंद्रपूर: मनोज जरांगेना उत्तर देण्यासाठी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात राज्यातील ओबीसी समाजातील विविध जातसमुदायाच्या प्रतिनिधींची ‘ओबीसी बचाव परीषद’ १७ डिसेंबरला चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे, या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज पेटून उठला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत घटनादत्त ओबीसी समाजाचे अधिकार व हक्क प्रलंबित आहेत. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ओबीसी समाज व संघटना सातत्यपूर्ण लढा देत असूनही सध्या राज्यात सुरु असलेले वातावरण ओबीसी समाजाला डीवचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार ओबीसीतील सर्व जातसमूहाने एकत्र येवून ओबीसींच्या सर्वंकष मागण्यांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील जात संघटनांची मूठ बांधून ओबीसी संगठन आणखी मजबूत करणे, या उद्देशाने विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या सहभागातून ओबीसी समाजातील समस्त जात, उपजात समूह संघटना, ओबीसी संघटना मिळून “ओबीसी बचाव परिषद” च्या माध्यमातून सद्यपरिस्थितीवर मंथन करण्यात येणार आहे. त्यानुसार ओबीसी समाजातील जातसंघटनेच्या चर्चेअंती संमत होणारे ठराव राज्य सरकारला व केंद्र सरकारला हिवाळी अधिवेशन दरम्यान देण्यात येणार आहे.

Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
navi mumbai airport naming movement will be intensified After election says Naming Committee President Dashrath Patil
निवडणुकीनंतर विमानतळ नामकरण आंदोलन तीव्र, नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची माहिती

हेही वाचा… भाजप पदाधिकाऱ्याने प्राप्तिकर विभागाच्या माजी अधिकाऱ्याला गंडवले; पळून जात असताना…

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आरक्षणाबाबतची भूमिका वारंवार बदलत असताना दिसून येत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या व ओबिसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, ही त्यांची मागणी ओबीसी समाजाचे नुकसान करणारी आहे. त्यासाठीच ‘ओबीसी बचाव परीषद’ आयोजित करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजातील सर्व जातसमुदायाने एकत्र येवून आपली एकता व ताकद संपूर्ण देशाला दाखवावी, असे आवाहन विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.