नागपूर: मकर संक्रात म्हणजे आनंदाचा सण. या सणात सर्व वयोगटातील अनेक नागरिकांना रंगीबीरंगी पतंग उडविण्याचा मोह आवरता येत नाही. यावेळी उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो. त्यामुळे पतंग उडविताना काही दुर्घटना होऊ नये याची सावधगिरी बाळगण्यासाठी वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी भागात अपुऱ्या जागेमुळे छतावर पतंग उडविताना अनेक जण घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विचार करत नाही. त्यामुळे काळजी न घेतल्यास वीज अपघात होतात. वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याची स्पर्धाही जीवघेणी ठरू शकते.

season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Agricultural policy changes Increase in edible oil import duty Elections farmer print eco news
कृषिधोरण बदलांची क्षेपणास्त्रे ‘बूमरॅंग’ होणार?
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?

हेही वाचा… नरेंद्र जिचकार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी….

वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊ शकते. त्यामुळे या आनंददायी सणाला गालबोट लागू नये याकरिता योग्य खबरदारी घेऊनच पतंग उडवावे. पालकांनी दक्ष राहून मुलांना पतंग उडविण्यासाठी मार्गदर्शन करावे. सध्या बाजारात मिळणाऱ्या धातूमिश्रित रसायनाचे आवरण असलेला मांजा विजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांनी केले आहे.

  • वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.
  • तारेत अडकलेला पतंग काढण्याचा अट्टहास करू नये.
  • वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नये.
  • पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये.
  • धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.
  • दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नका.
  • पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.