लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंदखेडराजा : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आज, सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास दाखल झाले. त्याच सुमारास मुनगंटीवार हे सिंदखेडराजामध्ये दाखल झाले होते. नियोजित कार्यक्रमानुसार ते जन्मस्थानी जायला निघाले. मात्र, याचवेळी जरांगे त्यांच्या शेकडो समर्थकासह लखुजी राजे राजवाड्यात दाखल झाल्याचे कळाले. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्यासाठी ते विश्रामगृहात थांबून राहिले. त्यांनी समजूतदारपणा दाखवीत काही मिनिटे प्रतीक्षा करणे पसंत केले.

पूर्वघोषित कार्यक्रमानुसार मुनगंटीवार आज सकाळी ९ वाजता सिंदखेड राजा येथे दाखल होणार होते. मात्र, ते ५ तास उशिरा दाखल झाले. अभिवादन नंतर त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर असलेल्या राजवाडा जतन व संवर्धन या कामाचे भूमिपूजन केले. दुपारी दीड ऐवजी संध्याकाळी उशिरा ते मोटारीने येथून समृद्धी महामार्गाने त्यांनी संभाजीनगरकडे प्रयाण केले.

आणखी वाचा-रेल्वेला झाला उशीर…चक्क उच्च न्यायालयाची सुनावणीच थांबली…

नियोजित वेळेपेक्षा येथे उशिरा आगमन झालेले मुनगंटीवार यांना जिजाऊ जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. जरांगे जन्मस्थळी नतमस्तक झाले व तेथून निघाल्यावरच मुनगंटीवार राजवाड्यात पोहोचले. त्यानंतर जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन केल्यावर ते पंचायत समिती सभागृहात दाखल झाले. त्यांनी सिंदखेड राजा विकास आराखडा चा पालकमंत्री वळसे पाटील यांच्या समवेत आढावा घेतला. तसेच जिजाऊंच्या टपाल तिकिटाचे अनावरण केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To avoid controversy after manoj jarange patil returned sudhir mungantiwar visited the birthplace of jijau scm 61 mrj