तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर शहरात १५ सप्टेंबरला मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.मात्र जिल्हा प्रशासनाच्या मद्य विक्री बंदी आदेशावर विक्रेत्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत.
प्रशासनाने ‘ड्राय-़़डे’ जाहीर केला की, विक्रेत्यांची समांतर यंत्रणा कामाला लागते. ते म्हणतात, ‘ड्राय डे’ जाहीर झाला की आम्हीच ग्राहकांना याची सूचना देतो, नियमित मद्य खरेदी करणारे दोन दिवसाचा ‘स्टॉक’ घेऊन ठेवतात. यामुळे विक्री वाढते. तान्हा पोळ्याला मद्य विक्री बंद आहे. त्यानंतर शनिवार-रविवार लागून आहे. त्यामुळे गुरूवारी मद्य दुकानात गर्दी अधिक राहण्याचीशक्यता आहे, असे विक्रेत्याने सांगितले.