अकोला : बृहन्मुंबईतील कोट्यवधींच्या चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी शहरात जेरबंद बंद केले. आरोपीकडून चोरीतून ३६.५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बृहन्मुंबई येथील ओसीवारा पोलीस ठाण्यांतर्गत करोडो रुपयांची चोरी झाली. या गुन्ह्यातील सहभागी आरोपी संतोष चव्हाण हा गुन्ह्यातील रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. तो अकोल्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याचा शहरात शोध घेऊन रोख रक्कमसह त्याला ताब्यात घेण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी शहरात गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. दोन पथके तयार करून शोध घेण्यात आला. आरोपी न्यू तापडिया नगरातील क्रांती चौक येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने कौशल्यपुर्ण पद्धतीने संशयित आरोपी संतोष सुदमा चव्हाण (रा. तेजश्री अपार्टमेंट, घनसोली नवी मुंबई) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेल्या रक्कमेपैकी ३६ लाख ५० हजारांची रोख जप्त केली.

हेही वाचा >>> गोंदिया : कॉलम व पाया शिवाय भिंतीचे बांधकाम; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

गत दोन महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने चोरीची ३५ लाखापेक्षा जास्त रक्कम जप्त करण्याची ही दुसरी घटना आहे. आरोपी व रोख रक्कम ओसीवारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, रवी खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुल चव्हाण आदींच्या पथकाने केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To the accused in the theft case of crores in brihanmumbai ppd 88 ysh
Show comments