चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पळविण्यासाठी व जेरबंद करण्यासाठी पुन्हा मुखवट्याचा प्रयोग केला जात आहे. येथे २० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. दरम्यान, लक्ष्मीबाई रामराव कन्नाके या महिलेचा २५ ऑगस्ट २०२३ रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वनिवभागाने तत्काळ कार्यवाही पूर्ण करीत अवघ्या दोन दिवसात मृत महिलेचे पती रामराव कन्नाके व त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात २५ लाख रुपयांची मदत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ ऑगस्ट २०२३ रोजी भद्रावती तालुक्यातील टेकाडी गावातील महिला लक्ष्मीबाई रामराव कन्नाके ही महिला शेतात काम करीत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले. वनविभागाने तात्काळ कार्यवाही करून मृतकाचे वारस पती रामराव जगन्नाथ कन्नाके यांचे बँक खात्यात १० लाख रुपये अदा करून मृतकाचे सर्व वारस यांचे बँक खात्यात उर्वरित १५ लाख रुपये मुदत ठेव जमा करण्यात येत आहे. याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी पुढाकार घेऊन वारसांना तात्काळ मदत मिळवून दिली. मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून गावामध्ये जनजागृती करण्यात येत असून फलक व बॅनर लावण्यात आले आहे. वन्यप्राण्यापासून सावधगिरी बाबत ऑडीओ क्लिप तयार करून लाउडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात येत असून विशेष व्याघ्र संरक्षण दल यांचे पथक व २५ पीआरटी सदस्य यांचेद्वारे शेतशिवार परिसरात वाघाच्या हालचाली टिपत आहे. सदर परिसरात २० कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने सनियंत्रण कार्यवाही सुरु आहे. शेतकरी यांना मुखवटे वाटप करण्यात आलेले आहे.

हेही वाचा… युवतीवर ट्रकच्या कॅबिनमध्ये सामूहिक बलात्कार, पाप झाकण्यासाठी डोक्यावर टॉमीने वार करून खून

हेही वाचा… प्रेमाचा त्रिकोण; वर्गमित्राला चाकूने भोसकले

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार समिती गठीत करण्यात आली असून समितीने केलेल्या उपाययोजना राबविल्या जात आहे. भविष्यामध्ये मनुष्यहानी टाळण्यासाठी बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शनात मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे कार्यवाही करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To ward off tiger villagers now using mask in chandrapur district rsj 74 asj
Show comments