नागपूर: राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी (६ जानेवारी) महिला आणि बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप होईल. तर नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक प्रा.ॲडा योनाथ यांची  विशेष उपस्थिती हे शुक्रवारचे विशेष आकर्षण राहणार आहे. शनिवारी दुपारी भारतीय विज्ञान काँग्रेसचा समारोप होत आहे. सकाळी नऊ ते दुपारी ३.३० या दरम्यान राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाचा (चिल्ड्रन सायन्स काँग्रेस) समारोप डॅा. ए.पी.जे. अब्दुल कलाम हॅालमध्ये होईल. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत नृत्य आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे आयोजन मेन डोममध्ये करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे असणार परिसंवाद

शुक्रवारी एकूण आठ परिसंवाद होणार आहेत.  डॅा. ए.के. डोरले सभागृहात ‘थेरेपेटिक अँड प्रिव्हेंटिव्ह ॲप्रोचेस इन कॅन्सर’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी युनिव्हर्सिटी आफ कॅनकासचे अनिमेश धर असतील.  युनिव्हर्सि्टी आफ टेक्सासचे डॅा. जोया चंद्रा, आणि डॅा. रॅाय जेनसन सहभागी होतील. तर ‘रिसेंट परसपेक्टीव्ह आफ सायन्स अँड टेक्नॅालॅाजी टू मीट ग्लोबल चॅलेंजेस फॅार सस्टनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर परिसंवाद डॅा. रामानुजन ॲाडिटोरियम येथे होईल. यात अध्यक्षस्थानी इंडियन सायन्स काँग्रेसचे  अरविंद कुमार  सक्सेना, डॅा. हिमांशु पाठक, डॅा. अजय कुमार सिंग सहभागी होतील. 

हेही वाचा >>> नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले

दुसऱ्या सत्रात १२ वाजेदरम्यान तीन परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहेत. यात डॅा. ए.के. डोरले सभागृहात ‘ट्युमन मायक्रो इनव्हायर्मेंट’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानी कॅनकास विद्यापीठाचे डॅा. श्रीकांत आनंद असतील. या परिसंवादात डॅा. सुफी मेरी थॅामस, प्रा. दीपाली शर्मा सहभागी होतील. डॅा. रामानुजन सभागृहात  ‘नॅनो बायोटेक्नॅालॅाजी इन सोशिओ- इकोनॅामिक डेव्हलपमेंट’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी मंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. के. बयरप्पा असतील. तर वंदना पत्रावळे, डॅा. शशी बाला सिंग, डॅा. संजय माथुर सहभागी होतील. सकाळच्या तिसऱ्या सत्रात रसायनशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘ॲडव्हान्सेस रिसर्च प्रॅक्टिसेस इन फिजिकल सायन्स’ परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॅा. कमल सिंह असतील. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॅा. शेखर मांडे, प्रा. पंकज सगदेव सहभागी होतील.

हेही वाचा >>> फळ्यावर लिहा, नंतर खाऊन घ्या!, चिमुकल्या संशोधकाने तयार केला पौष्टिक खडू

दुपारी १२ ते १.३० या तिस-या सत्रात एकूण  तीन परिसंवाद होणार आहेत. डॅा. ए.के. डोरले सभागृहात होणाऱ्या पहिला सत्रात  केमिकल बायोलॅाजी अँड ड्रग डिस्कव्हरी या विषयावरील परिसंवाद होईल. यात अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रा. के.एस. रंगप्पा अध्यक्षस्थानी असतील. तर जपानच्या होक्काडिओ विद्यापीठाचे डॅा. हिरोशी हिनोऊ, सिंगापुरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॅा. गौतम सेठी आणि डॅा. तापस कुंडू सहभागी होतील. डॉ. रामानुजन सभागृहात ‘कॅन्सर थेरॅापेटिक्स’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जयपूरच्या निर्वाण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. अशोक कुमार असतील. तर डॅा. राणा सिंग, डॅा. धनलक्ष्मी सिवानंदन आमि डॅा. रुबी जॅान अन्टो सहभागी होतील. इंडियन सायन्स काँग्रेसच्या परिसंवादाचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॅा. एस.व्ही.काणे यांच्या अध्यक्षतेखालील सोशल ॲप्लिकेशन्स फॅार स्टॅटिस्टिकल प्रॅक्टीक या विषयावर होईल. या परिसंवादात प्रा. अवनीश कुमार सहभागी होतील.