नागपूर: सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (१० मार्च २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. सराफा बाजारातील सोमवारच्या सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढतच आहे. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु कालांतराने पून्हा सोन्याचे दर झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जागतिक महिला दिनीही (८ मार्च २०२५) नागपुरात सोन्याचे दर वाढले होते. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (१० मार्च २०२५) नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर पून्हा नागपुरात सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.

नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८५ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये होते. हे दर शनिवारी (८ मार्च २०२५ रोजी) प्रति दहा ग्राम ८६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये असे नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दर वाढतच आहे. त्यातच सोमवारी (१० मार्च २०२५) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८६ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये होते. त्यामुळे ८ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात १० मार्च २०२५ रोजी सोन्याच्या दरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १०० रुपये, २२ कॅरेटसाठी १०० रुपये, १८ कॅरेटसाठी १०० रुपये, १४ कॅरेटसाठी १०० रुपये वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही बदल…

नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९५ हजार ३०० रुपये होते. हे दर ८ मार्च २०२५ रोजी प्रति किलो ९७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर सोमवारी (१० मार्च २०२५ रोजी) ९७ हजार २०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात ८ मार्चच्या तुलनेत १० मार्चला चांदीच्या दरात प्रति किलो २०० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.