वर्धा : श्रावण महिना हिंदू संस्कृतीत व्रत वैकल्याचा मास म्हणून ओळखल्या जातो.यात सोमवती अमावस्या व्रताला विशेष महत्व आहे.१७ जुलैला सोमवार असल्याने सोमवती तसेच या दिवशी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारचे व्रतही पाळल्या जाणार आहे.या दिवशी जो भक्त भगवान शंकराची विधिपूर्वक पूजा करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते, असे मानल्या जाते.या दिवशी श्रद्धा कर्म,तर्पण,स्नान व ध्यान करून भक्तांना अपार पुण्य प्राप्त होते.तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होत असल्याची श्रद्धा आहे.जीवनातील समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे.
हरियाली अमावस्या पण म्हटल्या जाते.१६ जुलै रात्री १० वाजून ८ मिनिटांनी सुरू होत १८ जुलै रोजी सकाळी १२ वाजून १ मिनिटांनी समाप्ती आहे.मात्र आज तिथी वेध असल्याने ती आज साजरी होत आहे. सकाळी आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घाला.एका चौकटीवर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकून पार्वती व भगवान शंकर यांच्या मूर्तीची स्थापना करावी.उदबत्ती लावून नेवैद्य अर्पण करावा. आरती म्हणावी.