नागपूर : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साधारण तीन डिसेंबरपर्यंत हे चक्रीवादळ तयार होईल. यादरम्यान विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोसमी पाऊस परतला असला तरीही अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. हवामान खात्याने शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर लावले फलक

विदर्भात या आठवड्याच्या सुरुवातीला रविवार ते मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान दोन दिवस किमान तापमानसह कमाल तापमानात कमालीची घट दिसून आली. त्यामुळे सलग दोन दिवस हवेत प्रचंड गारठा होता. दिवसदेखील हुडहुडी भरावणारी थंडी असल्याने दिवसाही गरम कपड्यांशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता अचानक तापमानात वाढ झाली आणि पुन्हा उकाडा जाणवू लागला. दरम्यान, आता पुन्हा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यामुळे वातावरणात सातत्याने प्रचंड बदल घडून येत आहेत.