नागपूर: नागपूरसह देशभरात १९ जुलैला सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेटसाठी ६० हजार रुपयांवर गेले होते. त्यानंतर हे दर कमी झाल्याने गुरुवारी (१७ ऑगस्ट) ५८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. हे गेल्या काही आठवड्यातील निच्चांकीवर आहे.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार १७ ऑगस्ट २०२३ रोजी (गुरुवारी) नागपुरात २४ कॅरेटसाठी ५८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५५ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार २०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७० हजार ५०० रुपये होता. हे दर १० ऑगस्ट २०२३ रोजी (गुरुवारी) नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.
हेही वाचा… राखी निर्मितीतून अपंगांसाठी रोजगार निर्मिती
दरम्यान सध्या दर कमी झाले असले तरी भविष्यात हे दर वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले. त्यातच सध्या दर कमी असल्याने ही सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी असल्याचेही ते म्हणाले.