बुलढाणा : आज जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसाने एका निष्पाप बालिकेचा बळी घेतला. संग्रामपूर तालुक्यात भिंत कोसळून अडीच वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची घटना घडली. संग्रामपूर तालुक्यात आज अवकाळी पावसाने काही ठिकाणी संमिश्र स्वरूपाची हजेरी लावली. तालुक्यातील काटेल येथे झालेल्या मुसळधार पावसाने गणेश रमेश बोरवार यांच्या घराची भिंत कोसळली.

हेही वाचा >>> नागपूर : मनोरुग्णालयात करोनाचा उद्रेक; नवीन सात रुग्णांना बाधा

यामुळे कृष्णाली गणेश बोरवाल या अंदाजे अडीच वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. यावेळी नजीकच असलेली तिची बहीण राधा मात्र सुदैवाने बचावली. या घटनेमुळे काटेल गावात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. एकलारा, काटेलचे तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल संग्रामपूर तहसीलदार यांना सादर केला आहे.

Story img Loader