Samriddhi Highway Toll Booths Closure : मुंबई समृध्दी महामार्गावरील चार टोल नाक्यांवरील सुमारे दोनशे कर्मचारी संपावर गेल्याने नाक्यावरील फास्टटॅग स्कॅनिंग थांबले आहे. त्याचा फटका या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसतो आहे.त्यांना अधिकचा टोल द्यावा लागतो आहे.
नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावरील चार टोल नाक्यावरील सुमारे २०० कर्मचारी मागील चार दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. त्यामुळे नाक्यावरील फास्ट टॅग स्कॅनिंगचे काम थांबले. महामार्गावर टप्पा निहाय टोल आकारणी केली जात आहे. फास्ट टॅग च्या माध्यमातून वाहनधारकांच्या बॅक खात्यातून टोलची रक्कम वजा होते. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे. त्यासाठी वाहनावरील फास्ट टॅग स्टिकर स्कॅन करावे लागते. त्यासाठी टोल नाक्यावर कर्मचारी नियुक्त केले आहे.
फास्ट टॅग नसलेल्या वाहनांकडून अधिकचा टोल घेतला जातो. मागील चार दिवसांपासून टोल नाक्यावरील कर्मचारी संपावर गेल्याने फास्टटॅग स्कॅनिंग शिवाय वाहने जात आहे. त्यांच्याकडून अधिकचा टोल घेतला जात आहे,अशी तक्रार वाहनधारकांची आहे. विशेषत; मुंबईकडून नागपूरला येणाऱ्या वाहनांना चारपट अधिक टोल भरावा लागतो,अशी तक्रार आहे. असाच प्रकार संभाजीनगर नाक्यावर होत आहे. वेतनवाढ व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा नियम लागू करावे अशी मागणी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची आहे.