चंद्रपूर: ताडोबात वाघाच्या अनेक भावमुद्रा पर्यटकांना दिसून येत आहे. यामुळे पर्यटकांची पावले ताडोबाकडे दिवसेंदिवस वळू लागली आहेत. सध्या ताडोबात कोर झोनमध्ये पर्यटन बंद असले तरी बफर झोनमध्ये बबली व तिची पिल्ल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
बुधवारी निमढेला (रामदेगी) गेटवरून नागपूर, वणी येथील काही पर्यटकांनी ताडोबा सफारी केली. पर्यटकांना बबली आणि तिचे दोन पिल्लू फूल मस्ती करताना दिसून आले. त्यांनी हे दृश्य कॅमेरामध्ये कैद केले आहे. बबलीचा एक पिल्लू पाण्यात शिकारीच्या शोधात असतो, तेवढ्यात दुसरा तेथे येतो आणि पहिल्याच्या गालावर दोन झापड मारतो, असे पर्यटकांनी दिलेल्या व्हीडिओमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा… पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजार जास्त, काय आहेत कारणे?
बबली आणि तिच्या दोन पिल्लांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. बफर झोनमध्ये सफारी करताना हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची ताडोबात गर्दी होत आहे.