नागपूर: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कार. याच मेळघाटातील चिखलदरा म्हणजे पर्यटकांसासाठी अप्रतिम पर्यटन स्थळ. हा निसर्ग आता धुक्यात हरवलाय आणि त्याला अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत. धुक्यातून आपली वाट शोधत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिमझिम बरसणारा पाऊस आणि बोचरी थंडी असे आल्हाददायी वातावरण चिखलदऱ्याचे झाले आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांमुळे चिखलदरा आणि मेळघाट बहरले आहे. मेळघाटातील संपूर्ण सातपुडा पर्वतरांग ही धुक्यांमध्ये हरविली आहे. परतवाड्यावरून चिखलदराकडे जाताना काही उंचीवरच धुक्यांच्या दाट चादरीमुळे अवघ्या दहा मीटर अंतरावरचेही समोर काही दिसत नाही, अशी परिस्थिती आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/chikhaldara-fog.mp4
व्हिडीओ सौजन्य- जयंत वडतकर

हेही वाचा… हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांना पुराचा इशारा

गत तीन दिवसांपासून भर दुपारी बारा वाजता देखील वाहनांचे दिवे लावूनच प्रवास करावा लागतो आहे. जे पर्यटक पहिल्यांदाच अशा वातावरणात चिखलदऱ्याला येत आहेत त्यांच्यासाठी घाटातील प्रवासाचा हा अनुभव अतिशय थरारक असाच आहे. चिखलदरा येथे असणारे हरिकेन पॉईंट, भीम कुंड, स्कायवाक पॉईंट, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट अशा सर्वच महत्त्वाच्या पॉईंट्सवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

हेही वाचा… नागपूर: मंदिर वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे, जाणून घ्या कारणे…

विशेष म्हणजे, रविवारी पहाटे हातभराच्या अंतरावर असणारा माणूस देखील ओळखता येणार नाही इतके प्रचंड धुके चिखलदऱ्यावर पसरले होते. या धुक्यात फिरण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला. या धुक्यांमुळे चिखलदरा येथे निर्माण होत असणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या स्कायवॉकचे पिल्लर देखील दिसेनासे झालेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist exploring fog in chikhaldara melghat nagpur rgc 76 dvr
Show comments