यवतमाळ : विदर्भात ताडोबा व्याघ्रप्रकल्पानंतर यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यात वाघांचे हमखास दर्शन होते. त्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेशातील पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचा ओढा टीपेश्वरमध्ये वाढला आहे. पर्यटकांना आता टीपेश्वर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासोबतच गोड मधाची चवही चाखता येणार आहे. कारण, या अभयारण्यालगत अंधारवाडी या आदिवासी गावात जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले आहे.

शासनाच्यावतीने आदिवासी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्या पुढाकारातून टीपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अंधारवाडी या आदिवासी गावात ‘मधाचे गाव’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. आदिवासी समाज जंगालांवर प्रेम करणारा रानावनात राहणारा समाज आहे. मध संकलनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायातून आर्थिक समृध्दीकडे नेता येऊ शकते, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी खादी व ग्रामोद्योग विभागाच्या सहकार्याने अंधारवाडीला मधाचे गाव करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आता पूर्णत्वास आला आहे.

The Hindu Lunisolar Calendar information in marathi
काळाचे गणित : बिनमहिन्यांचं वर्ष!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
spring the season of new beginnings
कहत है ऋतुराज आयो री…
Reshma Rathod receives warm welcome in Badlapur
खो-खो विश्वविजेत्या रेश्मा राठोडचे बदलापुरात जंगी स्वागत
significance of Vasant Panchami
Vasant Panchami: वसंत पंचमी आणि निजामुद्दीन दर्गा यांचा काय संबंध?
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा

हेही वाचा…विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

अंधारवाडी हे १९६ लोकसंख्येचे गाव असून, गावात ६५ कुटुंब आहेत. सुरुवातीस येथील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा विनामूल्य करण्यात आला. आता २५ कुटुंब प्रत्यक्षपणे मध संकलनाचे काम करत आहे. येत्या काही दिवसात अजून ३५ कुटुंबांना प्रशिक्षण व साहित्य दिले जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी दिली.

हे गाव टीपेश्वर अभयारण्यालगत असल्याने मधाचे गाव या संकल्पनेतून येथे पर्यटनास वाव मिळावा आणि
मध संकलनातून रोजगार व आर्थिक समृध्दी साधण्यासोबतच टीपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाचे मध उपलब्ध व्हावे, हा देखील या संकल्पनेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था देखील गावकऱ्यांच्या मदतीने ‘होम स्टे’ उभारून येथे सुरू केली जाणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गसंपन्न वातावरणात मध संकलनाची प्रक्रिया अनुभवता येईल. गावकरी पर्यटकांच्या हातात मधाचे पोळ देत मधुमक्षिका पालन प्रक्रिया समजावून सांगत असल्याने वेगळा अनुभव पर्यटकांना येथे घेता येतो.

हेही वाचा…नागपुरकरांची इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती… तीन वर्षांत दुचाकी, चारचाकी…

अंधारवाडी गावाने दाखविलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ होण्याचा मान या गावाला मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या गावाला नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. चांगल्या उपक्रमासाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी मेश्राम, उपसरपंच रविंद्र परचाके व गावकऱ्यांचे त्यांनी कौतूक केले. टीपेश्वर अभयारण्यात आलेल्या काही विदेशी पर्यटकांनीही अंधारवाडी गावास नुकतीच भेट दिली व मध गोळा करण्याचा अनुभव घेतला.

मधाच्या अर्थकारणातून चालना

सुरुवातीस गावकऱ्यांना मध संकलनासाठी प्रत्येकी १० पेट्या देण्यात आल्या आहे. त्यात पाच पेट्या पोळ असलेल्या तर पाच पेट्या रिकाम्या आहेत. एका पेटीत साधारणपणे सहा ते आठ पोळ तयार होतात. मध तयार झाल्यानंतर पोळाला ईजा न होता यंत्राच्या सहाय्याने ते काढले जाणार आहे. पुढे तेच पोळ पुन्हा मधाने भरले जाईल. त्यामुळे कमी कालावधीत अधीक मधाचे संकलन या गावात होणार आहे. उत्तम दर्जाच्या मधाला बाजारात प्रतिकिलो ५०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. येथील शुद्ध मध विक्रीतून गावाच्या अर्थकरणालही चालना मिळणार आहे.

Story img Loader