चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबात ९१ वाघ व शंभरावर बिबटे असले तरी काळा बिबट्या ताडोबात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्पात देश विदेशातील पर्यटक पट्टेदार वाघ तथा बिबत बघण्यासाठी येतात. मात्र आता वाघ व बिबट्या सोबत काळा बिबट्या हा ताडोबाच्या मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. बहुसंख्य पर्यटकांना काळा बिबट्या दर्शन देत आहे. गेल्या महिन्यात काळा बिबट्या त्याचा दोन पिल्लांसोबत जंगलात भटकंती करताना पर्यटकांना दिसला होता. तेव्हा त्यांचा जंगल भ्रमंतीचा व्हिडिओ चांगलाच सार्वत्रिक झाला होता.

आता पुन्हा एकदा काळा बिबट्या दिसताच पर्यटक आनंदी झाले. ताडोबाच्या पांढ़रपौनी जवळील चिखलवाही वाटर होल जवळ या काळा बिबट्या ने दर्शन दिले आहे. पर्यटक पी.वी. सुब्रमण्यम यांनी काळ्या बिबट्याचे फोटो काढले आहेत. काळा बिबट्या हा पाणवठ्यावर पाणी पित असताना हे फोटो काढण्यात आले आहेत. सुब्रमण्यम यांच्या सोबत इतर अनेक पर्यटकांना या काळ्या बिबट्याने दर्शन दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists were spotted by a black leopard in the tadoba andhari tiger reserve rsj 74 amy
Show comments