बुलढाणा : मेहकर तालुक्यातील डोणगावनजीकच्या जनूना गावाजवळ ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहे.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वार (एम.एच. २८ बी.एन. ४०८८) डोणगावकडून वाडगावकडे जात होते.
ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २८ एजे ३९७३) विरुद्ध दिशेने येत असताना धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहने डोणगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली.