बुलढाणा : खामगाव उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयावर आज, सोमवारी काढण्यात आलेला ट्रॅक्टर मोर्चा, पोलिसांनी अडविला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले. यामुळे खामगाव एसडीओ कार्यालय परिसरात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यापूर्वी तालुक्यातील बोरी आडगाव येथे शेतकऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, यासह इतर मागण्यांसाठी ७ दिवसांपासून सात शेतकरी आमरण उपोषण करीत आहे. मात्र, अजूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आज खामगावकडे ट्रॅक्टरने कूच केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र, खामगाव पोलिसांनी काही अंतरावरच हा मोर्चा रोखून धरला. त्यामुळे काही काळ पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.

हेही वाचा – वर्धा : एक ग्लास दारूचा नव्हे, एक ग्लास दुधाचा; चला व्यसनास बदनाम करू या… कोण म्हणतंय असं? वाचा…

हेही वाचा – ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये वाहनांच्या दोन कि.मी. रांगा, प्रवाशांना फटका

मोर्चा अडवल्याने संतप्त झालेल्या युवा शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसूनच आंदोलन सुरू केल आहे. आंदोलनात वयोवृद्ध, महिला शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले आहे.