लोकसत्ता टीम

यवतमाळ : सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने घरात ठेवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी अत्यल्प दरात विक्रीस काढले आहे. त्यामुळे सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजार समितीत मात्र व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असे चित्र आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. वादळी पावसाची शक्यता असल्याने बाजार समितीत माल विक्रीस आणणारे शेतकरी पाऊस आला तर सोयाबीन भिजेल, या काळजीने चिंतातूर झाले आहेत. यवतमाळ, बाभूळगाव आदी बाजार समितीत शेतकऱ्यांचे सोयाबीन उघड्यावर पडून असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-पोलीस दलात इतकी पदे रिक्त, महिला पोलिसांच्या पदांचाही…

सोयाबीनची हमी दराने खरेदी होईल, या आशेने शेतकऱ्यांनी कापणी नंतर सोयाबीन घरातच ठेवले. निवडणुकीनंतर सोयाबीनचे भाव वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र निवडणूक होवून दोन आठवडे उलटले तरी सरकार स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरवाढीच्या प्रतिक्षेत, आहे ते सोयाबीनही अत्यल्प दरात विकावे लागेल, या भीतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजार समितीत विक्रीस आणले आहे. सोयाबीनच्या प्रतवारीनुसार तीन हजार दोनशे ते चार हजार ३०० रूपये असा प्रति क्विंटल दर सोयाबीनला मिळत आहे.

बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढल्याने ते ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे. व्यापाऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन सुरक्षितपणे शेडखाली ठेवण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाहेर ठवलेले आहे. पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस आल्यास सोयाबीन कुठे ठेवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा-सरस्वती विद्यालयाच्या सहल बसला अपघात:अनधिकृत पीयूसी देणाऱ्या केंद्रावर काय कारवाई होणार?

आधीच सोयाबीनला भाव नाही, पावसात भिजल्यास दर आणखी घसरण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. बाभूळगाव बाजार समितीमध्ये तालुक्यासह कळंब, राळेगाव, यवतमाळ तालुक्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेवून आले आहेत. मात्र येथे व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये तर शेतकऱ्यांचा बाहेर असल्याची ओरड शेतकरी करत आहेत. बाजार समितीचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाजार समितीस विनंती

शेतकरी सोयाबीनच्या भाववाढीची प्रतीक्षा करत होते. बाभूळगाव बाजार समितीत पाच, सहा तालुक्यातील सोयाबीन विक्रीस आले आहे. आज पावसाळी वातावरण असून पाऊस कोसळण्याची दाट शक्यता असल्याने माल बाहेर पडून असलेले शेतकरी धास्तावले आहे. बाजार समितीने याची तत्काळ दखल घेवून शेतकऱ्यांचा माल शेडमध्ये ठेवावा, अशी विनंती बाजार समितीस केल्याची माहिती बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवीचे सरपंच सचिन चव्हाण यांनी दिली.