लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ऑफीस, बाजार किंवा अन्य कामांसाठी तुम्ही दुचाकी-चारचाकी वाहनांनी घराबाहेर जात असला तर कोणत्या रस्त्याने जावे किंवा कोणत्या रस्त्याने जाणे टाळावे हे लक्षात घ्या. येत्या एक व दोन तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी रस्ते वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे तर काही रस्त्याची दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे एक व दोन डिसेंबरपासून जर अजनी, मेडिकल चौक, धंतोली किंवा रहाटे कॉलनी चौकासह काही विशिष्ट मार्गांवरून जात असाल तर ही बातमी नक्की वाचा.

उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही बिघडलेली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा असल्यामुळे पोलिसांसमोर वाहतूकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दोन दिवस रहाटे कॉलनी, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-‘चला माझ्या ताडोबाला’! ४० हजार विद्यार्थ्यांनी घेतला मोफत सफारीचा आनंद

यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी अधिसूचना जारी केली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेदेखील शहरात राहणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्ग, धंतोली, रहाटे कॉलनी, सिव्हील लाईन्स, रेशीमबाग चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक इत्यादी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात ठेवून चार मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहे. शहरात राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील काही ठिकाणच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-“आधी हवेची गुणवत्ता तपासा, मगच वीज प्रकल्पाचा विस्तार करा”, विशाल मुत्तेमवार असे कुणाला म्हणाले?

येथे आहे ‘नो पार्किंग’

-रहाटे कॉलनी ते धंतोली पोलीस ठाणे<br>-धंतोली चौक पोलिस ते भोलागणेश
-बैद्यनाथ चैक ते मेडीकल चौक ते रेल्वे मेन्स हायस्कुल टी पॉइंट कांबळे चौक
-रेल्वे मेन्स् हायस्कुल टी पॉईन्ट कांबळे चौक ते जगन्नाथ विश्वासर ते सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल तुकडोजी महाराज पुतळा

बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वर्धा मार्गाकडून येणारी जड वाहतूक जामठा टी पॉईंट येथे थांबविण्यात येईल किंवा आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. त्याचप्रमाणे दिघोरी नाका ते मेडिकल व मानेवाडा चौकाकडे वाहतूक आऊटर रिंग रोडने वळविण्यात येईल. कळमेश्वर व वाडीमार्गे येणारी जड वाहतूक नवीन काटोल टोल नाक्यावरून आवश्यकतेनुसार इतर मार्गाने वळविण्यात येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in nagpur due to presidents visit adk 83 mrj
Show comments