नागपूर : जड वाहनांना प्रवेशबंदीची वेळ व नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहने थेट शहरातून धावत आहेत. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांशी हातमिळवणी करून ही वाहने शहरात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

अवजड वाहने शहराबाहेरून जाण्यासाठी बाह्यवळण रस्त्यांचा पर्याय आहे. तरीही ही वाहने शहरातून जातात. एकीकडे शहरात नाकेबंदी सुरू असताना अवजड वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. अवजड वाहनांना ठराविक वेळेत शहरात प्रवेश करण्यास बंदी आहे. या वेळेत विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिकही कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशा वेळी अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे आजवर शहरात अनेक अपघात झाले असून निष्पापांचे बळी गेले आहेत. अशा अपघातांना आळा बसावा, वाहतूक कोंडी कमी व्हावी, नियमभंग करून शहरात येणाऱ्या जड वाहन चालकांवर कारवाई व्हावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

हेही वाचा – अकोला : ‘जलजीवन मिशन’मधून गावांतील जलस्त्रोतांचे बळकटीकरण

पैसे घेऊन कृपादृष्टी

वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांना अडवून हेल्मेट-कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यग्र असतात. मात्र, या पोलिसांसमोरून शहरात अवैधरित्या प्रवेश केलेली जड वाहने सर्रासपणे धावत असतात. या वाहनांना पोलीस थांबवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेतात व त्यांना सोडतात. दुचाकीचालकांवर कारवाई तर जड वाहनांवर कृपादृष्टी यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अधिसूचना आहे, पण….

शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) (क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना (वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा जास्त असणारी) दुपारी १२ ते ४ व रात्री रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठराविक मार्गावरूनच व इतर तत्सम मार्गावरून प्रवेश राहणार, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली आहे.

हेही वाचा – अमरावती : ऑनलाईन खरेदी पडली महागात! नोकरदाराची १० लाख रुपयांची फसवणूक

“अवजड वाहनांना शहरात ठराविक वेळेत प्रवेशबंदी आहे. जर कुणी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रतिबंधित मार्गावरून प्रवेश करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.” – विनोद चौधरी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

Story img Loader